महाराष्ट्र

२९ पैकी १५ ठिकाणी महिला महापौर; महानगरपालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, बघा लिस्ट

ज्या प्रवर्गासाठी हे आरक्षण जाहीर झाले आहे, त्याच प्रवर्गातील व्यक्तीला महापौरपदाची लॉटरी लागणार आहे. २९ पैकी अर्ध्याहून जास्त महानगरपालिकांमध्ये महिलांच्या खांद्यावर महापौरपदाची धूरा असणार आहे.

Krantee V. Kale

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी झाल्यापासून महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आज अखेर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत दुपारी १२ च्या सुमारास आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी आरक्षण सोडत निर्णायक ठरणार आहे. ज्या प्रवर्गासाठी हे आरक्षण जाहीर झाले आहे, त्याच प्रवर्गातील व्यक्तीला महापौरपदाची लॉटरी लागणार आहे. २९ पैकी अर्ध्याहून जास्त महानगरपालिकांमध्ये महिलांच्या खांद्यावर महापौरपदाची धूरा असणार आहे. २९ पैकी १५ महानगरपालिकांमध्ये महिलांसाठी महापौरपद आरक्षित असणार आहे.

बघा २९ महानगरपालिकांसाठी कसं आहे महापौरपदाचं आरक्षण

मुंबई - खुला प्रवर्ग (महिलांसाठी)

ठाणे - अनुसूचित जाती

नवी मुंबई - खुला प्रवर्ग (महिलांसाठी)

कल्याण डोंबिवली - अनुसूचित जमाती

भिवंडी- निजामपूर - खुला प्रवर्ग

उल्हासनगर - ओबीसी

मीरा भाईंदर - खुला प्रवर्ग (महिलांसाठी)

वसई विरार - खुला प्रवर्ग

पुणे - खुला प्रवर्ग (महिलांसाठी)

पिंपरी चिंचवड - खुला प्रवर्ग

कोल्हापूर - ओबीसी

इचलकरंजी - ओबीसी

सांगली मिरज कूपवाड - खुला प्रवर्ग

सोलापूर - खुला प्रवर्ग

छत्रपती संभाजीनगर - खुला प्रवर्ग

लातूर - अनुसूचित जाती प्रवर्ग (महिलांसाठी)

जालना - अनुसूचित जाती प्रवर्ग (महिलांसाठी)

पनवेल - ओबीसी

अकोला - ओबीसी (महिलांसाठी)

अहिल्यानगर - ओबीसी (महिलांसाठी )

चंद्रपूर - ओबीसी (महिलांसाठी)

जळगाव - ओबीसी (महिलांसाठी)

अमरावती - खुला प्रवर्ग

धुळे - खुला प्रवर्ग (महिलांसाठी)

नांदेड वाघाळा - खुला प्रवर्ग (महिलांसाठी )

नागपूर - खुला प्रवर्ग (महिलांसाठी)

नाशिक - खुला प्रवर्ग (महिलांसाठी)

परभणी - खुला प्रवर्ग

मालेगाव - खुला प्रवर्ग (महिलांसाठी)

नवी मुंबई विमानतळ नेटवर्क वाद : NMIAL वर आरोप, TRAI अ‍ॅक्शन मोडमध्ये; टेलिकॉम दरांची तपासणी सुरू

ग्रीनलँड वाद शमण्याची चिन्हे! ट्रम्प यांचा यू-टर्न; युरोपियन देशांवर टॅरिफची धमकी मागे घेतली, बळाचा वापर करणार नसल्याचंही केलं स्पष्ट

Republic Day Alert: '२६-२६' कोडमुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क; गुप्तचर यंत्रणेकडून दहशतवादी हल्ल्याचा इशारा

शिंदेसेनेला मिळू शकते एक वर्षासाठी महापौरपद; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंना दणका देण्याची भाजपची नवी खेळी

तपासणीच्या बहाण्याने विमानतळ कर्मचाऱ्याचे कोरियन महिलेसोबत अश्लील कृत्य; पुरुषांच्या वॉशरूमजवळ घेऊन गेला अन्...