विधान परिषद निवडणुकीत ९९.०२ टक्के मतदान; २२ जूनला मतमोजणी 
महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीत ९९.०२ टक्के मतदान; २२ जूनला मतमोजणी

बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले.

Swapnil S

मुंबई : बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानात एकूण ७ हजार ४७ मतदारांपैकी ६ हजार ९७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे राज्यभरात सरासरी ९९.०२ टक्के इतके मतदान नोंदविण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी २२ जूनला होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ मे रोजी निवडणूक जाहीर केली होती. या १७ जागांमध्ये नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. सहा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने पुणे, ठाणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड, यवतमाळ, वर्धा -चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आज ११ जागांसाठी मतदान पार पडले.

या निवडणुकीत भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सर्वच्या सर्व म्हणजे ४५७ मतदारांनी मतदान केल्याने १०० टक्के मतदानाची नोंद झाली. तर अमरावती मतदारसंघात ४५१ पैकी ४२७ मतदारांनी मतदान करत ९४.६८ टक्के मतदान झाले, जे सर्वात कमी राहिले.

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai : घाटकोपरमध्ये दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, Video

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग