देवश्री भुजबळ/मुंबई :
या मान्सून हंगामात, १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान, महाराष्ट्रात सरासरीच्या १९ टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांपैकी दुष्काळग्रस्त मराठवाडा हा सर्वाधिक कोरडा राहिला असून तिथे सरासरीपेक्षा ४० टक्के कमी पाऊस झाला आहे; त्यानंतर विदर्भात २३ टक्के, कोकणात १४ टक्के आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
आता कोणत्याही अतिरिक्त पावसामुळे ही तूट कमी होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, कारण हवामान विभागाने ३ ते ८ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघार घेत असल्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या बुलेटिननुसार, पुढील दोन दिवसांत गुजरातच्या बहुतांश भागातून आणि महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘एल निनो’ हवामान परिस्थितीमुळे पावसाची ही तूट निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आपल्या २०२६ च्या मान्सून अंदाजात संपूर्ण भारतात यंदा कमी पाऊस पावसाचा इशारा दिला होता.
जिल्हे : टक्के
बीड : ५१%
हिंगोली : ४९%
परभणी : ४०%
सोलापूर : ५८%
अहिल्यानगर : ४६%
सिंधुदुर्ग : ३६%