प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

राज्यात १२ ऑक्टोबरनंतर पावसाची 'एक्झिट'; ६ ते ८ दरम्यान पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज

येत्या ६ ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बरसेल. ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान राज्यभर ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, १२ ऑक्टोबरनंतर मान्सून महाराष्ट्रातून परत फिरणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Swapnil S

पुणे : येत्या ६ ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बरसेल. ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान राज्यभर ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, १२ ऑक्टोबरनंतर मान्सून महाराष्ट्रातून परत फिरणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

यंदा मान्सूनचा प्रवास भारतात आणि महाराष्ट्रात लांबला आहे. ऑक्टोबरची सुरुवात झाली तरीही मान्सून वेळेत परतलेला नाही. नवरात्र आणि दसरा पावसात गेल्यामुळे, आता दिवाळीचा सण पावसात जाणार का, अशी चिंता सर्वसामान्य नागरिकांना सतावत होती. या परिस्थितीत हवामान विभागाने एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जारी केली आहे.

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधून कोसळणाऱ्या परतीच्या पावसाचा प्रभाव मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान पुन्हा जाणवेल. या कालावधीत राज्यभरात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, पुढील तीन दिवसांसाठी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. उर्वरित भागांमध्ये पावसाची उघडीप राहील. १२ ऑक्टोबरनंतर मान्सून महाराष्ट्रातून पूर्णपणे माघार घेणार आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून, अधूनमधून हलक्या सरी येत असल्या तरी मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे. हवामान विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या काही भागांत ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम

डिसेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, १ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: १९ नगरपरिषदांच्या निवडणुकीला स्थगिती; बारामती, अंबरनाथमध्ये पुन्हा गोंधळ

मुंबईच्या नावासाठी उद्धव ठाकरे कडाडले, 'जिथे-जिथे बॉम्बे लिहलंय तिथे...