प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

तासिका तत्त्वावरील शिक्षकांसाठी नवे पोर्टल; सेवा सुसूत्रतेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या सेवेत सूसूत्रता येणार आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नवीन पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून या पोर्टलमध्ये सर्व शिक्षकांची माहिती, शैक्षणिक अर्हता, त्यांना मिळणारे मानधन याबद्दलची माहिती नोंदवण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या सेवेत सूसूत्रता येणार आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नवीन पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून या पोर्टलमध्ये सर्व शिक्षकांची माहिती, शैक्षणिक अर्हता, त्यांना मिळणारे मानधन याबद्दलची माहिती नोंदवण्यात येणार आहे तसेच या शिक्षकांचा पगार ठराविक तारखेला मिळण्यातही हे पोर्टल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

राज्यातील विद्यापीठांमध्ये आणि अनुदानित महाविद्यालयांमध्येही शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यास मंजुरी मिळाली असली, तरी ही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयाचा भार तासिका तत्त्वावरील शिक्षकांवर आहे.

या शिक्षकांना महाविद्यालयांकडून अत्यल्प मानधन मिळते. राज्यातील उच्च व तंत्रशिक्षणाचाही दर्जा उंचावण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या प्रणालीत बदल करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी विभागाने पोर्टलची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. हे पोर्टल नव्या शैक्षणिक वर्षाच्या म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या सुरुवातीपासूनच कार्यान्वित होणार आहे.

पोर्टलमध्ये संपूर्ण तपशील मिळणार

या पोर्टलमध्ये राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात तसेच विद्यापीठांच्या विभागांमधील प्रत्येक तासिका तत्त्वावरील शिक्षकाची नोंद होणार आहे. यामध्ये शिक्षकाची शैक्षणिक पात्रता, तो शिक्षक कोणत्या महाविद्यालयांमध्ये कोणते विषय शिकवतो, त्याला मिळणारे मानधन इत्यादी माहितीची नोंद केली जाणार आहे. या माध्यमातून शिक्षकांचा संपूर्ण तपशील अद्ययावत ठेवण्यात येणार आहे.

Mumbai : शीव पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार; अतिरिक्त पालिका आयुक्तांनी केली पाहणी

Budget 2026 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडला? उद्या सादर होणारं बजेट कितवं? जाणून घ्या

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना

ठाणे शहरात उभारले जाणार १९ ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स; प्रमुख चौकांमध्ये उपलब्ध होणार सुविधा; पीपीपी तत्त्वावर प्रकल्पाला मंजुरी

Mumbai : ...ती भ्रूणहत्याच ठरेल; न्यायालयाने नाकारली गर्भपाताची परवानगी; खर्च राज्यशासनाने करण्याचे आदेश