महाराष्ट्र

महाराष्ट्र एक नंबर! ठरले देशातील सर्वात स्वच्छ राज्य; केंद्राने जारी केली यादी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले गेले. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

Rakesh Mali

केंद्र सरकारने वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणाची यादी जाहीर केली आहे. यात 2023 मध्ये महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक स्वच्छ राज्य ठरले आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, स्वच्छ शहरांच्या बाबतीत मध्यप्रदेशच्या इंदुरने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. इंदुर सलग सातव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. तर, सूरतने दुसरा आणि नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले गेले. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

या यादीत उत्तरप्रदेशमधील वाराणसीला सर्वात स्वच्छ 'गंगा शहर' पुरस्कार देण्यात आला. तर, नोएडाला 'फाइव्ह स्टार' रँकींगसह- उत्तरप्रदेशमधील सर्वात स्वच्छ शहर म्हणून स्थान मिळाले.

स्वच्छ भारत मिशन-शहर एक भाग म्हणून 2016 मध्ये वार्षिक पुरस्कार सुरू करण्यात आले होते. 2023 च्या पुरस्कारांमध्ये 4,416 शहरी स्थानिक संस्था, 61 छावण्या आणि 88 गंगेच्या काठांवरील शहरांचा सहभाग करण्यात आला.

सत्याच्या मोर्चात असत्याचाच बोलबाला

नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा तूळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ