‘पॉश’चे उल्लंघन केल्यास ५० हजारांचा दंड 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

‘पॉश’चे उल्लंघन केल्यास ५० हजारांचा दंड

नाशिक येथील ‘टीसीएस’ कंपनीत घडलेल्या गंभीर प्रकाराची दखल घेत राज्य सरकारने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक (पॉश) कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : नाशिक येथील ‘टीसीएस’ कंपनीत घडलेल्या गंभीर प्रकाराची दखल घेत राज्य सरकारने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक (पॉश) कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला व बालविकास आयुक्त जगदीश मिनियार यांनी शुक्रवारी या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.

पॉश कायद्यानुसार १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खाजगी आस्थापनांना अंतर्गत तक्रार समिती (आयसीसी) स्थापन करणे बंधनकारक आहे तसेच या समितीची नोंदणी केंद्र सरकारच्या 'शी-बॉक्स' पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. या नियमांचे पालन न केल्यास आस्थापना प्रमुखाला ५० हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. वारंवार उल्लंघन झाल्यास हा दंड दुप्पट केला जाईल किंवा आस्थापनेचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

'अशी' आहे समितीची रचना

पॉश कायद्यांतर्गत प्रत्येक समितीमध्ये एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करणे आवश्यक आहे. याशिवाय किमान दोन कर्मचारी सदस्य आणि एका अशासकीय संस्थेचा (एनजीओ) सदस्य समितीमध्ये असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे समितीतील किमान ५० टक्के सदस्य महिला असणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पात्र संस्थांमध्ये या समित्या स्थापन झाल्या आहेत की नाही, याची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

Mumbai : रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर दोन मिनिटांत सुरू होणार; पश्चिम रेल्वेच्या नवीन व्यवस्थेमुळे खंडित वेळ होणार कमी

७०२ कोटींचा प्रस्ताव मंजूर; सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते वरळी प्रॉमेनेड जोडणाऱ्या पादचारी पुलाचा मार्ग मोकळा

Navi Mumbai : उरणला साथीच्या आजारांचा विळखा; रुग्णालयांत रुग्णांची गर्दी

ST सहकारी बँकेत ३४ कोटींचा गैरव्यवहार? खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी