रब्बी हंगामही दुष्काळाच्या फेऱ्यात; फक्त २७ टक्क्यांवर पेरण्या पूर्ण 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

रब्बी हंगामही दुष्काळाच्या फेऱ्यात; फक्त २७ टक्क्यांवर पेरण्या पूर्ण

दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रात रब्बी पेरणीचा वेग मंदावला असून, राज्यातील पाच वर्षांच्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १५.६९ लाख हेक्टर अर्थात २७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत २५.९९ लाख हेक्टर म्हणजेच ४५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

Swapnil S

मुंबई : दुष्काळी परिस्थितीमुळे महाराष्ट्रात रब्बी पेरणीचा वेग मंदावला असून, राज्यातील पाच वर्षांच्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १५.६९ लाख हेक्टर अर्थात २७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत २५.९९ लाख हेक्टर म्हणजेच ४५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

राज्यात रब्बी पेरणीचे पाच वर्षांचे सरासरी क्षेत्र ५७.८० लाख हेक्टर आहे. २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पेरणीचे क्षेत्र १५.६९ लाख हेक्टरवर पोहोचले असल्याचे अधिकृत अहवालात नमूद करण्यात आले आहे. गत हंगामात रब्बी पेरणीचे अंतिम क्षेत्र ६७.५४ लाख हेक्टर होते.

राज्यातील आठ कृषी विभागांपैकी कोल्हापूर विभागात सर्वाधिक ३९ टक्के पेरणी झाली आहे. या विभागात पाच वर्षांच्या सरासरी ४.२३ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १.६६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.

नागपूर विभागात ३४ टक्के (१.७९ लाख हेक्टर), तर नाशिक विभागात ३३ टक्के (१.८९ लाख हेक्टर) पेरणी झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात २८ टक्के (२.०१ लाख हेक्टर), अमरावती विभागात २६ टक्के (२.३३ लाख हेक्टर), पुणे विभागात २५ टक्के (२.७२ लाख हेक्टर), लातूर विभागात २१ टक्के (३.२२ लाख हेक्टर), तर ठाणे विभागात सर्वात कमी ९ टक्के (२,९०३ हेक्टर) क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

गत हंगामाच्या तुलनेत केवळ नागपूर आणि नाशिक विभागात पेरणीचे क्षेत्र वाढले असून, उर्वरित विभागांमध्ये पेरणी कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Pune : बनावट औषधप्रकरणी इंडुकेअरचे परवाने रद्द; उत्पादन, पॅकिंग, तपासणी व वितरण तातडीने बंद करा, FDA चे आदेश

पेपरफुटीला कठोर शिक्षा; १० वर्षे कैद, १० कोटी दंड; सुधारणांऐवजी शिक्षेवर भर; व्ही. राधा समितीचा दुसरा अहवाल सरकारला सादर

भाजप-अकाली दलाची पुन्हा युती; पंजाबात सत्ता आल्यास अकाली दलाचा मुख्यमंत्री: अमित शहा

शतकमहोत्सवी संमेलनाध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय

SIR विरोधात देशव्यापी आंदोलन; २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार दुसरी फेरी