संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे; हवामान विभागाचा इशारा

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरियन बेटे, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान बेटे आणि अंदमान समुद्राचा उर्वरित भाग व्यापला आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरातही मोसमी वाऱ्यांची प्रगती झाली आहे.

Swapnil S

पुणे (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी शनिवारी दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरियन बेटे, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान बेटे आणि अंदमान समुद्राचा उर्वरित भाग व्यापला आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरातही मोसमी वाऱ्यांची प्रगती झाली आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये येते पाच दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाट विभाग, अहमदनगर, कोल्हापूर आणि त्यांच्या घाट विभागात आज, तर सोलापूर, सांगली आणि १९ मे रोजी अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा विदर्भात आजपासून पुढील पाच दिवस, तर कोकणात १९ आणि २० मे रोजी आणि मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात २० आणि २१ मे रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

आजपासून पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो, तर उद्या कोकणातही तुरळक पावसाची शक्यता आहे. कडकडाट आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे आणि नाशिक जिल्ह्यांचा घाट विभागातही मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज (१७मे) उर्वरित राज्यात, तर उद्या (१८ मे) नंदुरबार आणि जळगाव वगळता संपूर्ण राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९ मे रोजी पालघर, उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि जालना, हिंगोली, नांदेड वगळता उर्वरित राज्यात, तसेच २० आणि २१ मे रोजी संपूर्ण राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात पुढील ४८ तासांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, दुपारी आणि सायंकाळी ढग दाटून येतील. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील काही दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहरासाठी आजपासून पुढील काही दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत