महाराष्ट्र

महाराष्ट्रात ३० नवीन कोविड रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात बुधवारी कोविड-१९ चे ३० रुग्ण आढळले तर तीन मृत्यू झाले. यामध्ये साताऱ्यातील एक आणि नागपूरमधील दोन रुग्णांचा समावेश आहे, असे राज्य आरोग्य विभागाने सांगितले.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रात बुधवारी कोविड-१९ चे ३० रुग्ण आढळले तर तीन मृत्यू झाले. यामध्ये साताऱ्यातील एक आणि नागपूरमधील दोन रुग्णांचा समावेश आहे, असे राज्य आरोग्य विभागाने सांगितले.

१ जानेवारीपासून राज्यात संसर्गाचे २,४२५ रुग्ण आणि कोरोनाव्हायरसमुळे ३६ जणांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवीन रुग्णांपैकी आठ जण मुंबईतील, तीन ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्रातील, प्रत्येकी दोन नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या महानगरपालिका क्षेत्रातील, आठ पुण्यातील, पाच नागपूरातील आणि प्रत्येकी एक कोल्हापूर आणि सांगली येथील आहेत, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीपासून विषाणू संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या ३६ जणांपैकी ३५ जणांना सह-रोग (प्राथमिक निदानासोबतच असलेल्या वैद्यकीय परिस्थिती) होत्या, असे त्यात म्हटले आहे.

विभागाने या वर्षी आतापर्यंत राज्यात २७,३९४ कोविड-१९ चाचण्या केल्या आहेत, तर २,१६६ रुग्ण बरे झाले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, जानेवारीपासून मुंबईत ९७३ प्रकरणे नोंदली गेली आहेत, ज्यात जूनमधील ५३२ प्रकरणांचा समावेश आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video