सामाजिक न्याय मंत्री, संजय शिरसाट संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

SC Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरण : निवेदनासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, ई-मेल आयडी जारी

राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी येथे दिली.

Krantee V. Kale

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी येथे  दिली. 

अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण संदर्भात न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त एक सदस्यीय समितीने १६ मार्च २०२६ रोजी आपला अहवाल राज्य सरकारला  सादर केला होता. या अहवालावर आक्षेप, मते आणि  निवेदन मागविणे तसेच त्यावर सुनावणी घेण्यासाठी शासन निर्णय १० एप्रिल २०२६ अन्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.

निवेदन किंवा अर्जासाठी ई-मेल आयडी

या समितीसमोर अहवालाबाबत मते, आक्षेप करण्यासाठी इच्छुकांना ई-मेलद्वारे नोंदणी करण्याकरिता यापूर्वी १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, संबंधितांना आपले आक्षेप किंवा मते सादर करण्यासाठीची अंतिम मुदत आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. इच्छुकांनी dg-sw@barti.in या ई-मेल आयडीवर आपले निवेदन किंवा अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठाण्यात बुधवारी पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे पालिकेचे आवाहन

Mumbai : "जे कमावतो ते सगळं CNG मध्येच जातं!" दरवाढीनंतर टॅक्सी चालकांचा संताप; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Jalna : सरकारसोबतची चर्चा निष्फळ; मनोज जरांगेंचे अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने केली इच्छामरणाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

काय सांगता! दादरचा 'अशोक वडा पाव' जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित सँडविचच्या यादीत; टॉप ४० मध्ये मिळवले स्थान