दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

राज्य मंडळामार्फत लेखी, प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा सोमवार १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत होईल. तर प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होईल. तर बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत होईल. तर प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होईल.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mira-Bhayandar : मेहतांच्या कंपनीची बांधकाम परवानगी रद्द; अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार याची चर्चा

Mumbai : दहिसरमध्ये बेकायदा दुकाने तोडली; शिव वल्लभ रोडवरील अतिक्रमणांवर कारवाई

डीजीपींच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास केवळ ‘सौम्य शिक्षा’?; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

उपोषण मागे! सरकारशी चर्चेनंतर मनोज जरांगेंचा निर्णय; दिली तीन महिन्यांची अंतिम मुदत

महिलांची आज जपानशी सलामी! आशिया चषक विजेता भारतीय संघ आता आशियाई स्पर्धेच्या मोहिमेवर