संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

दहावी-बारावी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर; शिक्षण विभागाकडून प्रसिद्धी पत्रक जारी

विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी मिळावा, या उद्देशाने हे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या असून, त्यानुसार बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षा १० दिवस लवकर सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी मिळावा, या उद्देशाने हे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेत होण्यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळेत होणे आवश्यक असते. तसेच अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा मंडळाच्या परीक्षेनंतर होतात.

असे आहे वेळापत्रक

-लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा संभाव्य कालावधी - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५

-प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – २४ जानेवारी २०२५ ते १० फेब्रुवारी २०२५

-माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) परीक्षा – २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५

-प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन – ३ फेब्रुवारी २०२५ ते २० फेब्रुवारी २०२५

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा डोंबिवली स्थानकावर आज आणि उद्या रात्री पॉवर ब्लॉक

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

भारतात AI हब स्थापन होणार; गुगल करणार १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक: अदानीच्या सहकार्याने सर्वात मोठे डेटा सेंटर

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास