संग्रहित फोटो
महाराष्ट्र

इंधन दरवाढीचा फटका! आता एसटीचाही प्रवास महागणार; परिवहन मंत्र्यांचे दरवाढीचे संकेत

पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे आर्थिक गणित बिघडले असून संभाव्य आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी भाडेवाढीशिवाय पर्याय राहिलेला नाही.

Swapnil S

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे आर्थिक गणित बिघडले असून संभाव्य आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी भाडेवाढीशिवाय पर्याय राहिलेला नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दरवाढीची संकेत दिले. त्यामुळे लवकरच एसटीचा प्रवास महागणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या इंधन दरवाढीचा एसटीवर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेण्यासाठी सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे महामंडळावर वार्षिक सुमारे १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

एसटी महामंडळाला दररोज सरासरी १०.८७  लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासते. सध्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमार्फत डिझेलचा पुरवठा केला जात असून, मागील आठवड्यात प्रति लिटर ८८.२१  रुपये असलेला दर आता वाढून ९१.३१  रुपये झाला आहे. या दरवाढीमुळे महामंडळाला दररोज अंदाजे ३३ लाख ७०  हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.  मासिक स्तरावर हा भार सुमारे १० कोटी  तर वार्षिक  सुमारे १२४  कोटी रुपयांपर्यंत जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असून, एप्रिल २०२६  मध्ये महामंडळाला सुमारे ७६  कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. वाढत्या इंधन खर्चाचा थेट परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होत असून, भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेणे आवश्यक ठरू शकते, असेही सरनाईक म्हणाले. एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा यासाठी सरकार  विविध पर्यायांचा विचार करीत असून, इंधन बचत, ई-बसचा वाढता वापर, खर्च नियंत्रण तसेच महसूलवाढीच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येत असल्याचेही  त्यांनी सांगितले.

नवरीच्या दारात पोहोचण्याआधीच वऱ्हाडावर मृत्यूचा घाला! पालघरमध्ये ट्रक-कंटेनरच्या भीषण धडकेत दुचाकीही चिरडली; १३ ठार, अनेक जखमी

NEET Paper Leak: 'आरसीसी'च्या मोटेगावकरला ठोकल्या बेड्या; ९ दिवसांची सीबीआय कोठडी

Mumbai : कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप, विमान प्रवाशांचे हाल; मुंबई विमानतळावर ३ तास काम ठप्प

आजचे राशिभविष्य, १९ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

गाजर-कोथिंबीर ज्यूसने वाढेल इम्युनिटी; जाणून घ्या सोपी रेसिपी