एसटी महामंडळाची सुरक्षा बळकट होणार; एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाचे नेतृत्व लवकरच आयपीएस अधिकाऱ्याकडे 
महाराष्ट्र

एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाचे नेतृत्व लवकरच IPS अधिकाऱ्याकडे; गृह खात्याचा हिरवा कंदील

राज्यातील एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाला अखेर कणखर नेतृत्व मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी या महत्त्वाच्या पदावर लवकरच आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाला अखेर कणखर नेतृत्व मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी या महत्त्वाच्या पदावर लवकरच आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात स्वारगेट येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या सुरक्षा यंत्रणेतील ढिसाळपणा उघड झाला. त्यावेळी मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पद वर्षानुवर्षे रिक्त असल्याचे समोर आले. त्यावेळी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीला लवकरच आयपीएस दर्जाचा अधिकारी मिळेल, असे आश्वासन दिले. त्या आश्वासनाची पूर्तता आता प्रत्यक्षात येणार आहे.

एसटी महामंडळाच्या पाठपुराव्याला राज्याच्या गृह खात्याने हिरवा कंदील दाखवला आहे. मुख्यमंत्र्यांनी या नियुक्तीस मान्यता दिल्याने लवकरच एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाला अनुभवी, शिस्तप्रिय व कुशल आयपीएस अधिकारी प्रमुख म्हणून मिळणार आहे.

“मी कोणत्या गोंधळात अडकलेय”! राहुल गांधींच्या दाव्यानंतर ब्राझिलच्या मॉडेलची पहिली प्रतिक्रिया; Video व्हायरल

Mumbai : BMC च्या महिला आरक्षण सोडतीची तारीख जाहीर; SC, ST आणि OBC प्रवर्गांसाठी प्रक्रिया सुरू

ऊसदराचे आंदोलन चिघळणार? कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊस फेकण्याचा प्रयत्न

मुंबई आशियातील सर्वात 'आनंदी' शहर; बीजिंग आणि शांघायला मागे टाकत मारली बाजी

स्वदेशी 'इक्षक' जहाज आज नौदलाच्या ताफ्यात सामील होणार