...तर मुद्रांक शुल्क परतावा बंद! महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर 
महाराष्ट्र

...तर मुद्रांक शुल्क परतावा बंद! महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर

विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाल्यास कोणत्याही परिस्थितीत मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही, अशी स्पष्ट तरतूद असलेली महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ४८ मध्ये अत्यंत महत्त्वाची सुधारणा करणारे विधेयक मंगळवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले.

Swapnil S

मुंबई : विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाल्यास कोणत्याही परिस्थितीत मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही, अशी स्पष्ट तरतूद असलेली महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ४८ मध्ये अत्यंत महत्त्वाची सुधारणा करणारे विधेयक मंगळवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले.

राज्याच्या महसुलाचे संरक्षण करणे आणि कायद्यातील पळवाटांचा होणारा गैरवापर रोखणे हा या सुधारणेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्यक्ष व्यवहारात असे निदर्शनास आले आहे की, विकास करारांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क भरले जाते. तथापि, व्यावसायिक कारणांमुळे किंवा परस्पर मतभेदांमुळे हे करार पुढील टप्प्यावर रद्द, निरस्त किंवा समाप्त केले जातात आणि त्यानंतर भरलेल्या मुद्रांक शुल्काच्या परताव्यासाठी शासनाकडे अर्ज सादर केले जातात.

कायद्यात होणार नवीन स्पष्टीकरण दाखल

राज्याच्या महसुलाचे संरक्षण करणे तसेच कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात एकसमान व स्पष्टपणे व्हावी, यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ४८ मधील परंतुकानंतर सदर परंतुकाची शिथिलता किंवा परताव्याची तरतूद ही ‘करारनाम्याप्रमाणेच’ समान मुद्रांक शुल्क लागू होणाऱ्या विकास करारासह इतर कोणत्याही दस्तांना लागू होणार नाही.

मुद्रांक शुल्क आकारणीचा नियम

मुद्रांक शुल्क हा दस्ताच्या अंमलबजावणीवर आकारला जातो; कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली किंवा नाही, यावर तो अवलंबून नसतो. त्यामुळे करार रद्द झाला तरी अशा प्रकरणांमध्ये परतावा देणे महसुलीदृष्ट्या राज्यासाठी प्रतिकूल व नुकसानकारक ठरत होते. तसेच कायद्यातील सवलतींच्या तरतुदींचा गैरवापर होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

पळवाटा बंद

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम ४७ अन्वये विशिष्ट प्रकरणांमध्ये मुद्रांक शुल्क परतावा/सवलत देण्याची तरतूद असून कलम ४८ (१) मध्ये त्यासाठीची कालमर्यादा नमूद आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

नाशिक-विदर्भ प्रवाशांसाठी खुशखबर! 'स्पेशल'चा टॅग हटला, नाशिक रोड-बडनेरा मेमू आता नियमित, १६ स्थानकांना थांबा

Video : अवघ्या ५ मिनिटांच्या उशिराची 'अशी' शिक्षा? डिलिव्हरी बॉयचा मोबाईल हिसकावून फ्लॅटमध्ये नेलं अन्...

CJP चे Instagram हँडल अचानक बंद, काही तासांत पुन्हा सुरू; अभिजीत दिपके म्हणाले - 'स्वातंत्र्यदिनी आमचा आवाज...

Navi Mumbai Airport : 'पिंगा'च्या तालावर थिरकल्या तिरंगी पताका; स्वातंत्र्यदिनाची भन्नाट सजावट सोशल मीडियावर व्हायरल; VIDEO