दादा भुसे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

आता महाराष्ट्रातील शिक्षकांनाही गणवेश; शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा

महाराष्ट्रातील शिक्षकही आता गणेवशात दिसणार आहेत. राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना गणवेश (ड्रेसकोड) लागू करण्यात येणार आहे.

Swapnil S

मालेगाव : महाराष्ट्रातील शिक्षकही आता गणेवशात दिसणार आहेत. राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना गणवेश (ड्रेसकोड) लागू करण्यात येणार आहे. ड्रेसकोडसाठी खारीचा वाटा म्हणून शासननिधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

मालेगावच्या अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले, त्यावेळी दादा भुसे बोलत होते. आता शिक्षकांना ड्रेसकोड लागू झाल्यास पुढील काळात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात दिसणार आहेत.

विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून ज्ञानार्जन करावे, पालकांनी मुलांशी संवाद साधावा आणि शाळांनी सहलींसारखे उपक्रम राबवावेत, असेही मंत्री भुसे यांनी यावेळी आवाहन केले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री