महाराष्ट्र

लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ राज्य सरकार घेणार ताब्यात ; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची माहिती

लंडनमधील स्वातंत्र्यसैनिकांचे वास्तव्य असलेले ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र सरकार ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करणार आहे. या ऐतिहासिक इमारतीमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वास्तव्य होते, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : लंडनमधील स्वातंत्र्यसैनिकांचे वास्तव्य असलेले ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र सरकार ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करणार आहे. या ऐतिहासिक इमारतीमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वास्तव्य होते, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

नागपूरकर रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी मंत्री आशिष शेलार हे लंडन दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी ‘इंडिया हाऊस’ला भेट दिली होती. त्यावेळी लंडनस्थित भारतीयांनी या ऐतिहासिक इमारतीचे महत्त्व त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही ही इमारत ताब्यात घेण्याची मागणी केली होती. मंत्रालय दालनात शेलार यांनी आमदार देवयानी फरांदे, सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य, पुरातत्व विभागासह संबंधित विभागांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन याबाबत बुधवारी आढावा घेतला.

या बैठकीत ‘मित्रा’च्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून, त्यात सामान्य प्रशासन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग आणि वित्त विभागाचा सहभाग असेल. ही समिती ‘इंडिया हाऊस’ ताब्यात घेण्याबाबतचा सर्वकष अहवाल तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादरीकरण करणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आले. प्रस्तावित स्मारक ५ एकर क्षेत्रात उभारले जाणार असून, पार्किंग आणि अन्य सुविधांसाठी अतिरिक्त २ एकर जागा शासनाने घेतली आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांनी हे स्मारक वेगवेगळ्या टप्प्यात करून ते अधिक भव्यदिव्य व्हावे, अशी मागणी केली होती. त्यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर हे स्मारक उभारावे, अशी सूचना केली होती. याबाबत त्यांची संकल्पना समजून घेण्यासाठी मंत्री ॲड. शेलार यांनी दालनात बैठक घेतली.

Mumbai: कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना लवकरच दिलासा; १५ डब्यांच्या लोकलबाबत खूशखबर

तरुणांच्या विवाह योगात बिबट्यांचे विघ्न; दहशतीमुळे पुणे जिल्ह्यात विवाहेच्छुक तरुणांना मुली मिळेनात

Mumbai : नॅशनल पार्कमधील अतिक्रमित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधा; उच्च न्यायालयाचे आदेश

आता सुनावणी पुढच्या वर्षी; शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाबाबत २१ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी

पार्थ पवारांसह अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा! अंजली दमानिया यांची मागणी