प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

राज्यातील १६०० गावांना टँकरने पाणीपुरवठा; धरणातील पाणीसाठा ३७ टक्के

उन्हाच्या तीव्र झळांमुळे राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा एकीकडे झपाट्याने खालावत चालला आहे. तर दुसरीकडे राज्यातील टँकरची संख्या झपाट्याने वाढत असून राज्यातील सुमारे १६०० गावे आणि वाड्यांची तहान सध्या ४६६ टँकरच्या पाण्यावर तहान भागवली जात आहे.

Swapnil S

मुंबई : उन्हाच्या तीव्र झळांमुळे राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा एकीकडे झपाट्याने खालावत चालला आहे. तर दुसरीकडे राज्यातील टँकरची संख्या झपाट्याने वाढत असून राज्यातील सुमारे १६०० गावे आणि वाड्यांची तहान सध्या ४६६ टँकरच्या पाण्यावर तहान भागवली जात आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राज्यातल्या कोणत्या भागात किती पाणी टंचाई आहे याचा आढावा घेतला. तेव्हा बारा जिल्ह्याच्या पाणी टंचाईचा मोठा फटका बसल्याचे लक्षात आले. राज्यातील ४११ गावे आणि १ हजार १९४ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात असल्याचे लक्षात आले.

एप्रिल महिन्याच्या चौथ्या आठवड्यात ३२१ टँकर धावत होते. पण या आठवड्यात टँकरची संख्या एकदम ४६६ वर गेली आहे. सर्वाधिक म्हणजे १३८ टँकर संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा करीत आहेत. त्याखालोखाल नाशिकमध्ये ८३ टँकर वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करीत आहेत. ठाणे-३२, रायगड ५०, रत्नागिरी १८, पालघर २८, पुणे ३७ आणि साता-यात ४१ टँकरचा वापर होत आहे. राज्यातल्या धरणातील पाणीसाठाही झपाट्याने खालावत आहे. सध्याच्या घडीला राज्यातल्या सुमारे तीन हजार धरणांमधील पाणीसाठी ३७टक्क्यांवर आला आहे. राज्यातील वीज निर्मितीची मुख्य भिस्त असलेल्या साता-यातील कोयना धरणातील पाणीसाठा फक्त २५.७२ टक्क्यांवर आला आहे.

Nagpur : जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्री क्लोरीन वायूची गळती; ४० हून अधिक जण रुग्णालयात दाखल, VIDEO

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण