विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून 
महाराष्ट्र

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी एका अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली. या अधिवेशनात राज्यातील कळीचे कायदे, कर्जमाफी, जनहिताचे प्रश्न व विभागीय विकास आदी मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी एका अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली. या अधिवेशनात राज्यातील कळीचे कायदे, कर्जमाफी, जनहिताचे प्रश्न व विभागीय विकास आदी मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा फड रंगला आहे. त्यानंतर जिल्हा परिषदा व महापालिकांचीही निवडणूक होणार आहे. त्याची घोषणा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य विधिमंडळाचे नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी एका अधिसूचनेद्वारे हे अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.

आधार कार्ड नागरिकत्वाचा नव्हे फक्त ओळखीचा पुरावा; ECI चा सुप्रीम कोर्टात पुनरुच्चार

Mumbai : आज दुपारपर्यंत CNG पुरवठा होणार सुरळीत; MGL ने केले जाहीर

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकावर गुन्हा दाखल; चित्रपट करण्याच्या बहाण्याने डॉक्टरांचे ३० कोटी हडपल्याचा आरोप

लाडक्या बहिणींना दिलासा! ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

आरक्षण वाढले तर निवडणुका रोखू; ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका; सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला इशारा