महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यात महायुतीचा बोलबाला; १५ पैकी १५ जागा जिंकल्या

Maharashtra Assembly Elections Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्याच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा महायुतीच्या हातात गेल्या त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १५ ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचा बोलबाला असून विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. महायुतीने १४ पैकी ७ जागा अजित पवार राष्ट्रवादी, भा.ज.प. ५ तर शिंदे शिवसेना २ जागी विजय मिळवला.

Swapnil S

हारून शेख / लासलगाव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्याच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा महायुतीच्या हातात गेल्या त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १५ ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचा बोलबाला असून विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. महायुतीने १४ पैकी ७ जागा अजित पवार राष्ट्रवादी, भा.ज.प. ५ तर शिंदे शिवसेना २ जागी विजय मिळवला.

नाशिक जिल्ह्यातील महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी पाचव्यांदा निवडून येण्याचा पराक्रम केला छगन भुजबळ हे २६ हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर दिंडोरीतून नरहरी झिरवाळ तब्बल ४१ हजार मतांनी निवडून येत हॅट्रिक केली आहेत. तसेच देवळाली विधानसभा मतदारसंघातून सरोज अहिरे ४० हजार मतांनी दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. इगतपुरीतून हिरामण खोसकर ८६ हजार मतांनी दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. तसेच कळवणमधून नितीन पवार ८ हजार तर सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे ४० हजार मतांनी निवडून आले आहेत. तर निफाडमधून दिलीप काका बनकर हे २८ हजार मतांनी विजयी झाले आहेत.

तसेच महायुतीमधील भाजपकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमा हिरे या ७० हजार मतांनी, नाशिक मध्य मधून देवयानी फरांदे १७ हजार मतांनी, चांदवडमधून डॉ.राहुल आहेर ४८ हजार मतांनी, बागलाणमधून दिलीप बोरसे १ लाख २९ हजार ६३८ मतांनी आणि नाशिक पूर्व मधून राहुल ढिकले ७० हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघातून १ लाखाहून अधिक मतांनी पाचव्यांदा निवडून आले आहेत. तसेच सुहास कांदे नांदगावमधून ८० हजार मतांनी विजयी झाले आहेत.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड