महाराष्ट्र

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांमध्ये बेबनाव सुरू असल्याचे उघड होत आहे. महायुती सरकारमधील शिवसेना (शिंदे गट) सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठक घेण्यावरून जुंपली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांमध्ये बेबनाव सुरू असल्याचे उघड होत आहे. महायुती सरकारमधील शिवसेना (शिंदे गट) सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठक घेण्यावरून जुंपली आहे.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय खात्याच्या काही बैठकांचे आयोजन केले होते. त्याबाबत कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करून लेखी हरकत नोंदवली. त्याला प्रत्युत्तर देताना माधुरी मिसाळ म्हणाल्या की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसारच मी या बैठकांचे आयोजन केले आहे. शिवाय, सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्री म्हणून मला अशा बैठकांसाठी पूर्वपरवानगी घेण्याची गरज नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यावर शिरसाट म्हणाले की, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशा स्तरावरून निर्णय प्रक्रिया व्हावी. त्यांनी त्यांचे मत मांडले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे. त्यांनी विचारले असेल तर माझी त्यात काही हरकत नाही. सारखा सारखा पत्रव्यवहार करणे हे माझ्या स्वभावात नाही. मला ज्या काही सूचना करायच्या होत्या, त्या मी केलेल्या आहेत. त्यांनी काय उत्तर द्यायचे ते दिलेले आहे. त्यामुळे कोणता तरी वाद निर्माण झाला आहे असे समजण्याचे काही कारण नाही, असे त्यांनी म्हटले.

मिसाळ यांनी सांगितले की, माझ्याकडे जे पत्र आले त्याला मी उत्तर दिले आहे. कुठल्याही खात्याचा चांगला कारभार करायचा असेल तर प्रशासनाच्या बैठका घेणे, आढावा घेणे, त्यांना काही सूचना देणे हे माझे कर्तव्य आहे. तो माझ्या जबाबदारीचा भाग आहे. त्यांनी पत्र का दिले? हे तेच सांगू शकतात. मी स्वतंत्रपणे बैठका घेऊ शकते, तो माझा अधिकार आहे. त्यांच्या अधिकारात कुठेही ढवळाढवळ न करता बैठक घेतली. मी त्यांच्या अधिकाराचे कुठेही उल्लंघन केले नाही. त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला असावा, नाहीतर त्यांनी असे पत्र मला दिले नसते. आमच्या दोघात वाद नाही. आमच्या दोघांमध्ये व्यवस्थित संवाद आहे. पण, अचानक पत्र का आले? ही माझ्यासाठी देखील आश्चर्याची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

बैठक घेतल्यास अडचण काय ? - सुळे

भाजपच्या मंत्री माधुरी मिसाळ आणि शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांच्यातील वादावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "माधुरीताई महिला आहेत, एका महिलेला मंत्रिमंडळात संधी दिली आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना चालवायची आणि दुसरीकडे एखादी महिला मंत्री काहीतरी करू पाहते तर असे बोलायचं. माधुरीताई मंत्री झाल्या आहेत, त्या काहीतरी करू पाहत आहेत तर काय अडचण आहे ? चौकटीत राहून आणि शिष्टाचार पाळून त्या काम करत आहेत."

शनिदेवाच्या चरणी कोकाटे

दरम्यान, साडेसाती मुक्ती स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदूरबारमधील शनिमांडळ येथील शनिमहाराज मंदिरात अभिषेक आणि पूजाअर्चा करून विरोधकांवर विजय मिळावा, अशी प्रार्थना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. शनि मंदिरात जाऊन शनिदेवाची विधिवत पूजा करत विरोधकांच्या साडेसातीतून मुक्ती मिळावी म्हणून या साडेसाती मुक्ती ठिकाणाचे त्यांनी दर्शन घेतले आहे.

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास

डॉक्टरांना क्यूआर कोड अनिवार्य; बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय