महाराष्ट्र

यंदाच्या आषाढी वारीचे चोख नियोजन करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

नवशक्ती Web Desk

आगामी पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसंच पंढरपूर मंदीरात दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वेळेत दर्शन व्हावे यासाठी विशेष सुविधा करण्यात याव्या, याबाबच्या सुचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर आषाढी वारीसाठी निधीची कोणतीही कमतरता नसल्याचं सांगत नगरपालिकेसाठी 5 वरुन 10 कोटींची तर ग्रामपंचायतींसाठी 25 वरुन 50 लाख रुपयांच्या दुप्पट निधीची तरतूद केली असून रस्त्यांसाठी वेगळा निधी दिला असल्याचं सांगितलं. त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याबाबत काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी वारीविषयी सर्वोतोपरी खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. वारीत गर्दी होण्याची शक्यता असल्याने योग्य नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसंच वारी मार्गावर पाण्याचं नियोजन करण्यास सांगितलं. कोणत्याही पिरिस्थितीत मनुष्यबळ तसंच यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही असा बंदोबस्त करा, परिसरातली नगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या यंत्रणांची मदत घ्या, वारकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे तंबू-निवारे उभारा, पंखे आणि सावली यासाठी काळजी घ्या, वैद्यकीय टीम, तज्ञ तसंच रुग्णवाहिका यांची सज्जता ठेवा, औषधे, पिण्याच्या पाण्याचं आणि आरोग्य सुविधांबाबत वेळीच नियोजन करा, पंढरपूर नगरपालिका आणि आजूबाजूच्या रस्त्यांचं डांबरीकरण करा. कोणत्याही मार्गावर चिखल दिसता कामा नये याची दक्षता घ्या, असे निर्देश त्यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे अधिकारी दृकश्राव प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रातील विषमता आणि आंबेडकर

राक्षसी बहुमतापेक्षा मोठी जनशक्ती

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा