x
महाराष्ट्र

मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण, डॉ. चेतन पाटीलचा जामीन नामंजूर

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील याचा जामीन अर्ज येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश एच. डी. गायकवाड यांनी नामंजूर केला आहे.

Swapnil S

सिंधुदुर्गनगरी : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील याचा जामीन अर्ज येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश एच. डी. गायकवाड यांनी नामंजूर केला आहे. या कामी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकरी आणि अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रूपेश देसाई यांनी काम पाहिले. पाटील यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

पाटील याची सावंतवाडी कारागृहात रवानगी करण्यात आल्यानंतर त्याने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तांत्रिक सल्लागार चेतन पाटीलविरुद्ध विविध कलमान्वये मालवण येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Navi Mumbai : महापालिका पदभरती निकालाचा मार्ग मोकळा; संवर्गाचे स्कोअर कार्ड संकेतस्थळावर होणार जाहीर

Thane : खारफुटीतील भराव तात्काळ थांबवा! पोलीस आयुक्तांना NGT चा दणका, जिल्हाधिकाऱ्यांनाही फटकारले

Ulhasnagar : 'मी आमदार आहे, नगरसेवकाला विचारण्याची गरज नाही'; गोलमैदानातील विकासकामावरून आयलानी-पांडे आमनेसामने

Thane : गणेशोत्सवात अवजड वाहनांना 'नो एंट्री' विसर्जनाच्या पाच दिवसांत शहरात प्रवेशबंदी