संग्रहित छायाचित्र पीटीआय
महाराष्ट्र

मनोज जरांगे लिफ्ट अपघातातून बचावले; बीडच्या खासगी रुग्णालयातील घटना

मनोज जरांगे बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या भेटीसाठी आले असताना, त्यांच्यासह काही सहकारी लिफ्टमधून खाली उतरत होते. यावेळी लिफ्ट अचानक पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळली. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Swapnil S

बीड : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे रविवारी लिफ्ट अपघातातून थोडक्यात बचावले. बीड दौऱ्यावर असताना ही घटना घडली. बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या भेटीसाठी आले असताना, त्यांच्यासह काही सहकारी लिफ्टमधून खाली उतरत होते. यावेळी लिफ्ट अचानक पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळली. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.

मनोज जरांगे रविवारी बीड दौऱ्यावर आले आहेत. शहरातील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटण्यासाठी ते आले होते. भेट झाल्यानंतर पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर येण्यासाठी ते लिफ्टमध्ये बसले. त्यावेळी, अचानक लिफ्ट बिघडल्याने अपघाताची घटना घडली. वरच्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर येऊन आदळली. लिफ्टचा मोठा आवाज झाल्याने आसपासच्या लोकांनी तातडीने तळमजल्याकडे धाव घेतली. लिफ्टमध्ये अडकलेले मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आले.

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

Mumbai Dahi Handi 2026 : मालाडमध्ये विटांचा खांब कोसळला; ७ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल