संग्रहित छायाचित्र पीटीआय
महाराष्ट्र

मनोज जरांगे-पाटील यांचे आजपासून पुन्हा उपोषण

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील, मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.

Swapnil S

जालना :मराठा आरक्षशनिवारपासून म्हणजे २५ जानेवारीपासून ते पुन्हा आंदोलन करणार आहेत. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर चांगलीच टीका केली. जरांगे यांनी या आंदोलनाची दिशा अजून स्पष्ट केलेली नाही. शनिवारी कदाचित याविषयीची माहिती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या दीड वर्षापासून आंदोलन सुरू आहे, इतके दिवस झाले माझ्या गोरगरीब समाजाचा का छळ करताय, असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केला. मूळ मागणीसह इतर मुख्य मागण्यांसाठी मी उद्यापासून उपोषणाला बसणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी प्रमाणपत्र देणे, नोंदी शोधणे, शिंदे समितीला मुदतवाढ देणे, सगेसोयरे जीआरची अंमलबजावणी करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी आरक्षण पुन्हा लागू करणे या आपल्या मागण्या आहेत. मराठा समाजाची मने जिंकून घेण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही संधी आहे, असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाबद्दल द्वेष आहे की नाही हे आता सिद्ध होणार आहे. मराठ्यांशी गद्दारी आणि बेईमानी करू नका हे फडणवीस यांना माझे सांगणे आहे. मराठ्यांशी गद्दारी, बेईमानी केली तर मग मात्र सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आमच्या मुलांवर विनाकारण गुन्हे दाखल केलेत, नुसते भाष्य केले म्हणून ९ महिने कारागृहात ठेवले, महिलांना तडीपार केले, आमच्या महिलांचे डोके फोडले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. मराठ्यांबद्दल त्यांच्या मनात द्वेष असल्याचा आरोप त्यांनी केला.

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

माथेरानला मिळणार पाइपलाइनद्वारे गॅस; महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

Mumbai : नालासोपाऱ्यात ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; भाविक थोडक्यात बचावले, Video