महाराष्ट्र

मीरा रोड हत्याकांडातील आरोपी मनोज सानेचे पोलीस चौकशीत अनेक धक्कादायक दावे

यावेळी त्यानं मृत सरस्वती ही आपल्याला मामा म्हणत असल्याचा दावा देखील केला आहे.

नवशक्ती Web Desk

मीरा रोड हत्याकांडातील आरोपी मनोज सानेनं आपल्या लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यची अत्यंत अमानुषपणे हत्या केल्याची घटना घडली. यानंतर मनोजनं सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला कटरने कट करुन प्रेशर कुकरमध्ये शिजवलं. बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वांचा काळजाचा थरकाप उडाला. पोलिसांनी यानंतर आरोपी मनोज सानेला तात्काळ ताब्यात घेत न्यायालासमोर हजर केलं. न्यायालयानं मनोज सानेला 16 जूनपर्यंत चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.

सध्या पोलीसांकडून मनोज सानेची कसून चौकशी सुरु आहे. यावेळी त्यानं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मनोजनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेने आत्महत्या केल्याचं सांगितलं. तसंच आपल्यावर हत्येचा आरोप येऊ नये यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याचंही तो म्हणाला. यावेळी त्यानं मृत सरस्वती ही आपल्याला मामा म्हणत असल्याचा दावा देखील केला आहे.

आरोपी मनोज सानेनं पोलिसांना माहिती देताना सांगितलं की, तो HIV पॉझिटिव्ह आहे. यामुळे त्याच्या आणि सरस्वतीच्या नात्यात मागील काही दिवसांपासून तणाव होता. आरोपी मनोज साने दरवेळी काहीतरी नवे दावे करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तसंच तो चौकशीत सहकार्य करत नसून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं. मनोज सतत आपला जबाब बदलत असल्यानं त्याच्या चौकशीतून समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीचा तपास केला जाणार आहे. तसंच मनोज सानेचा मेडिकल रिपोर्ट आणि मृत सरस्वती वैद्यचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणातील बऱ्याच गौष्टींचा खुलासा होणार असल्याचं पोलिसांनी सांगितल आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत