महाराष्ट्र

Maratha Reservation: "...तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करु नका", हिंगोलीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाची आत्महत्या

गणेश काकासाहेब कुबेर असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

नवशक्ती Web Desk

मराठा आरक्षणासाठी सुसाईड नोट लिहून हिंगोलीत एका तरुणाने आपल्या जीवनाचा अंत केला. या घटनेला काही तास उटलत नाही तोवर मराठवाड्यात दुसऱ्या एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देखील आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या तरुणाने देखील आत्महत्या करण्यापूर्वी शाळेतील पाटीवर सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. गणेश काकासाहेब कुबेर असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या आपतगाव येथे एका मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश काकासाहेब कुबेर असं या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. आरक्षण मिळत नाही तोवर माझ्यावरती अंत्यसंस्कार करु नका, असं एका शाळेतील पाटीवर लिहुन या तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गणेश कुबेर या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर गावकरी गावकऱ्यांनी मोठी गर्दी या ठिकाणी जमली आहे. तर, घटनास्थळी चिखलठाणा पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी देखील पोहचले आहेत. मात्र, गावकऱ्यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या पत्नीला किंवा मुलाला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली आहे. याबाबत लेखी आश्वास मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात देणार नसून अत्यसंस्कार देखील करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या मागे पत्नीसह दोन मुलं आणि आई-वडील असा परिवार आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या