Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार 
महाराष्ट्र

Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे यांनी गुरुवारी दुपारी मुंबईकडे जाण्याचा आपला निर्धार व्यक्त केला आहे. सध्या वैद्यकीय उपचारासाठी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे थांबलेले जरांगे हे गुरुवारी दुपारी १ वाजेनंतर मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे यांनी गुरुवारी दुपारी मुंबईकडे जाण्याचा आपला निर्धार व्यक्त केला आहे. सध्या वैद्यकीय उपचारासाठी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे थांबलेले जरांगे हे गुरुवारी दुपारी १ वाजेनंतर मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मला मुंबईत जाण्यापासून कोणी रोखून दाखवावे. जर मला रस्त्यात अडवले, तर संपूर्ण मराठा समाजाने थेट मुंबईच्या दिशेने निघायचे, असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

सलग उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने आणि तीव्र निर्जलीकरण तसेच इतर आरोग्य समस्या निर्माण झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने उपचारांचा सल्ला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर जरांगे बुधवारी पहाटे पाटोदा येथे पोहोचले आणि तेथेच थांबले. सायंकाळी पत्रकारांना त्यांनी सांगितले, मी कोणाचेही ऐकणार नव्हतो, मात्र नारायणगड येथील धर्मगुरूंनी विनंती केल्यामुळे मी औषधोपचार घेण्यास तयार झालो. आज रात्रभर मी उपचार घेईन आणि गुरुवारी दुपारी १ वाजेनंतर मुंबईसाठी रवाना होईन.

फडणवीस सरकारवर निशाणा

आपल्या वाहनांच्या ताफ्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्यासोबत ८ ते १० गाड्यांचा ताफा असेल आणि इतर बांधवांनी सध्या लगेच सोबत निघू नये. तसेच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरोखरच माझ्या आरोग्याची काळजी असेल, तर त्यांनी आमच्या सर्व मागण्या तातडीने सोडून मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबईत मराठा समाजाने कधी जमायचे, याची तारीख सध्या जाहीर करणार नसल्याचे स्पष्ट करत जरांगे म्हणाले, शासनाकडून पुढील एका तासात काही नवीन मसुदा किंवा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी आत्ताच तारीख जाहीर करत नाही.

मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न

पुणे : पुण्यात मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच घेराव घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी गणेशदर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले असताना हा प्रकार घडला. मुख्यमंत्री फडणवीस हे मोहोळ यांच्या निवासस्थानी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. याची माहिती मिळताच मराठा आंदोलकांनी निवासस्थानाबाहेर एकत्र येत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तसेच मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

भाजप आमदार मेहतांची 'शरणागती'; भाईंदरमधील जमीन करावी लागली परत, पंतप्रधानांच्या भेटीनंतर शाळासोबत्याला दिलासा

तरुणाईवर राज्य करणारा नेता

नरेंद्र मोदी आणि त्यांनी मुक्त केलेली पिढी

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा बदामाचा शिरा; तुपाचा सुगंध आणि केशराची चव, अशी आहे सोपी रेसिपी