मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला जागृत करण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं धाराशिवमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीपान कोकाटे आणि आप्पासाहेब देशमुख यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले असताना मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामुळे या दोन कार्यकर्त्यांवर सभेचं आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील बातमी दिली आहे.
मराठा समूदायाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेत आहेत. त्यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी २४ डिसेंबर ही डेडलाईन दिली आहे. याआधी वातावरण निर्मितीसाठी जरांगे पाटील हे राज्यभर दौऱ्या करत आहेत. विविध ठिकाणी मराठा समाजाकडून त्यांच्या सभेचं आयोजन केलं जात आहे. असं असताना आज धाराशिवमध्ये जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, जमावबंदीचे आदेश असताना ही सभा आयोजित केल्याचा आरोप करत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याता आला असल्याचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिलं आहे.