महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ; समितीचा कार्यकाळ जून २०२७ पर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या न्यायमूर्ती सेवानिवृत्त संदीप शिंदे समितीच्या कार्यकाळाला राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.

Swapnil S

मुंबई : मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या न्यायमूर्ती सेवानिवृत्त संदीप शिंदे समितीच्या कार्यकाळाला राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारसोबतच्या यशस्वी चर्चेनंतर आपले उपोषण मागे घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या समितीचा कार्यकाळ ३० जून २०२७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऐतिहासिक कुणबी नोंदींची काटेकोर तपासणी करून पात्र मराठा बांधवांना प्रमाणपत्रे देण्याच्या उद्देशाने सप्टेंबर २०२३ मध्ये या समितीची स्थापना केली होती.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले