महाराष्ट्र

Maratha Reservation : राज्य सरकारने काढला नवा जीआर ; अर्जून खोतकर म्हणाले, "लढा यशाच्या मार्गाने..."

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला सुधारीत जीआर काढण्याची मागणी केली होती.

नवशक्ती Web Desk

मराठा आरक्षणासाठी(Maratha Reservation) काल मनोज जरांगे(Manjoj Jarange) यांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकार(Maharashtra Government) यांच्या चर्चा झाली. यानंतर आज राज्य सरकारचे आणि मनोज जरागे याचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी याठिकाणी दाखल झाले आहे. सरकारकडून जरांगे यांना पक्ष देण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांनी सुधारीत जीआर काढण्याची मागणी केली होती. दरम्यान सरकारच्या वतीने माजी आमदार अर्जून खोतकर(Arjun Khotkar) यांनी पक्ष वाचून दाखवला.

यावेळी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, "मी देखील या उपोषणात सहभागी आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही मनोज जरांगे पाटील यांची काळजी घेत आहोत. शासनासमोर हा प्रश्न मांडत आहोत. मुख्यंमंत्र्यांनी देखील ही जबाबदारी मला दिली आहे. रात्री मनोज जरांगेंच्या भूमिकेबाबत बैठक झाली. आम्ही नवीन जीआर काढला. तत्पूर्वी संपूर्ण लढा यशाच्या मार्गाने गेला पाहिजे. अनेक पिढ्या जरांगे यांच्या लढ्याचा इतिहास सांगतील."

मनोज जरांगे यांनी सरसकट आरक्षणाची मागणी केली होती. तसंच वंशावळीचा मुद्दा आणि सरसकट आरक्षणाबाबत मनोज जरांगे आग्रही होते. कालच्या बैठकीत ज्यांच्या नोदी नाहीत. त्यांच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ मागितला आहे. समाजीत लज्ज्ञ लोकांनी समितीला मदत करावी. समिती संभाजीनगरला बसून काम करेल, असं खोतकर म्हणाले. "

CJP Protest : 'अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन चालवण्याचा पोलिसांना अधिकार'; RAF च्या दारुगोळा वापराच्या नोंदी जतन करा - SC

'तुम्ही पतंजलीवर लक्ष द्या नाहीतर बंद पडेल'; रामदेव बाबांना अभिजीत दिपकेंचे प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याचे बनावट पत्र व्हायरल; PIB चा खुलासा

Mumbai : अटल सेतूवर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवण्याचा स्टंट; व्हिडीओ व्हायरल होताच रायडरविरोधात FIR दाखल

तोरणमाळच्या झिपलाईनवर जीव टांगणीला! ३,५०० फूट दरीवर अडकला पर्यटक; थरार पाहून धडकी भरेल, बघा Video