महाराष्ट्र

राज्यातील प्रत्येक शाळांत मराठी अनिवार्य; शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती

महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असून मराठी शाळा बरोबर आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असून मराठी शाळा बरोबर आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असून मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. मात्र इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आले होते. आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मराठी अनिवार्यच अशी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक असणार आहे. तसेच शिक्षण विभागाची पुढील वाटचाल कशी असेल, त्यासाठी काय करावे लागेल याबद्दल विविध घटकांची चर्चा सुरु आहे. शालेय शिक्षण विभागाचा रोड मॅप लवकरच तयार केला जाईल, असेही भुसे म्हणाले. केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य आहे. यातून त्यांना कोणतीही पळवाट काढता येणार नाही. याबरोबरच मराठी भाषेच्या अध्यापनाला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी त्या शाळेतील शिक्षकांनाही मराठी भाषेचे ज्ञान असायलाच हवे, अशी सूचना दादा भुसे यांनी केली आहे.

शिक्षणाच्या विकासासाठी दशसुत्री कार्यक्रम लवकरच

राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा संस्थाचालक संघटना यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी शालेय शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात विकास व्हावा, यासाठीचे सर्वंकष धोरण आणले जाणार आहे. येत्या आठ दिवसात शालेय शिक्षण विभागाच्या धोरणाचा रोड मॅप जाहीर होईल. शालेय शिक्षण विकासाचा एक दश सूत्री कार्यक्रम जाहीर करून तो राबवला जाईल, असे दादा भुसे म्हणाले.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य