महाराष्ट्र

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे.

नेहा जाधव - तांबे

मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून जीवितहानीसोबतच शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, १५० हून अधिक जनावरे दगावली असून १८ लाख हेक्टरहून जास्त शेती पाण्याखाली गेली आहे.

पूरामुळे ६७ गावांचा संपर्क तुटला, रस्ते वाहून गेले, घरे कोसळली आणि काही ठिकाणी तलाव फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. शेकडो नागरिकांना हेलिकॉप्टर आणि बोटींच्या साह्याने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. धाराशिव, बीड आणि परभणी जिल्ह्यांत आर्मी व एनडीआरएफचे पथक बचावकार्यात गुंतलेले आहेत.

यात सर्वाधिक धोक्याची परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात निर्माण झाली आहे. वाघेगव्हाण गावात १५० हून अधिक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते, ज्यांना वाचवण्यासाठी आर्मी आणि एनडीआरएफचे प्रयत्न सुरू आहेत.

शहापूर : खालापूरच्या धर्तीवर खुटघर इंटरचेंजचा विकास; मंत्रालय स्तरावर घडामोडी सुरू

पूरग्रस्तांना मदतीचा हात! राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

''हा खटला दिल्लीत का चालवायचा?'' समीर वानखेडेंना न्यायालयाचा सवाल, शाहरुख खान विरोधातील याचिकेवर सुनावणी

लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO ची चौकशी सुरू, संस्थेचा परवाना रद्द

मराठा समाज बांधवांना तूर्तास दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार