संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ; येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडले; संभाजीनगर, जालना जिल्ह्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्र राज्यात सध्या पावसाचे प्रचंड थैमान सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासूनच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील पूरस्थिती चिंताजनक झाली असून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. छत्रपती संभाजीनगर नांदेड, हिंगोली, बुलढाणा आदी जिल्ह्यांतील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Swapnil S

सुजीत ताजणे/छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्र राज्यात सध्या पावसाचे प्रचंड थैमान सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासूनच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील पूरस्थिती चिंताजनक झाली असून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. छत्रपती संभाजीनगर नांदेड, हिंगोली, बुलढाणा आदी जिल्ह्यांतील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अशातच हवामान खात्याकडून राज्यातील पाच जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील नागरिकांची चिंता चांगलीच वाढली आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला संभाजीनगर, जालना, बीड, आणि चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान, मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आज रात्रभरात ठिकठिकाणी ६० ते १०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक धरणे पूर्ण भरली आहेत. लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिवसह बहुतांश ठिकाणी धरणक्षेत्रात पडलेल्या पावसाने पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण असलेले येलदरी हे पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण परिसरात सुरू असलेला पाऊस तसेच खडकपूर्णा प्रकल्पातून वाढलेली पाण्याची आवक यामुळे धरणाचे सर्व १० दरवाजे उघडण्यात आले. दरवाज्यांमधून व जलविद्युत केंद्राच्या टर्बाइनमधून मिळून एकूण २३,८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरण भरल्याने परभणी, हिंगोली, नांदेड, वसमत, पूर्णा ही ५ प्रमुख शहरे तसेच २०० खेड्यांचा पाणी प्रश्न मिटला असून जवळपास ७०,००० हेक्टरवरील शेतीला याचा लाभ होणार आहे.

लेंडी नदीला पूर

लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे गावांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. शेतशिवारावरून गेलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे जमीन खरडून गेली आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. हे दृश्य अक्षरशः धडकी भरवणारे असून पाण्याचा जोर एवढा प्रचंड आहे की कुणालाही त्यात अडकण्याचा मोठा धोका आहे.

लातूर जिल्ह्यात शेती पाण्याखाली

लातूर जिल्ह्यातील उदगीर व अहमदपूर तालुक्यातील वाहतुकीवर पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. पुलावरून पाणी गेल्याने ५ ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. उदगीरदेगलूर मार्गावरील करजखेल पुलावरून पाणी जात असल्याने मार्ग बंद झाले आहेत, तर जिल्ह्यात शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, शेतऱ्यांनी पंचनामे त्वरित करावे, अशी मागणी प्रशासणाकडे केली आहे.

जालना जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला

जालना जिल्ह्यातील घनसावंगी, परतूर परिसरात नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला. औरंगाबाद शहरात सलग पावसामुळे खालच्या भागात पाणी शिरून नागरिकांना स्थलांतर करावे लागले. बीड आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उभी पिके पावसाने आडवी झाली असून सोयाबीन, मूग, उडीद यासारख्या पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल