कशेडी घाटात प्रचंड दरड कोसळली; मुंबई लेन १४ तास बंद 
महाराष्ट्र

कशेडी घाटात प्रचंड दरड कोसळली; मुंबई लेन १४ तास बंद

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटात धामणदिवी-चोळई गावाजवळ मंगळवारी रात्री प्रचंड दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद झाली. सुमारे १४ तासांनंतर बुधवारी दुपारी दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, मुसळधार पावसामुळे बचावकार्याला काही काळ अडथळा निर्माण झाला.

Swapnil S

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटात धामणदिवी-चोळई गावाजवळ मंगळवारी रात्री प्रचंड दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद झाली. सुमारे १४ तासांनंतर बुधवारी दुपारी दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, मुसळधार पावसामुळे बचावकार्याला काही काळ अडथळा निर्माण झाला.

मंगळवारी अन्नपूर्णासमोरील डोंगराचा मोठा भाग कोसळून संपूर्ण मुंबई लेन माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली गेला. दरडप्रवण क्षेत्रात सतत दगड कोसळत असल्याने कशेडी टॅप वाहतूक पोलीस व पोलादपूर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवत गोव्याकडे जाणारी लेन दुहेरी करून दोन्ही दिशांची वाहतूक सुरू ठेवली.

तहसीलदार कपिल घोरपडे, प्रांताधिकारी डॉ. पोपट ओमासे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना केल्या.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण