महाराष्ट्र

माथेरानसाठी क्ले पेव्हर ब्लॉक योग्य; नीरीचा अहवाल सुप्रीम कोर्टात

माथेरानमध्ये पर्यावरणपूरक रस्त्यांच्या कामासाठी ‘क्ले पेव्हर ब्लॉक’चा वापर योग्य असल्याचा अहवाल राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (NEERI) ने सुप्रीम कोर्टात सादर केला आहे.

Swapnil S

माथेरान : माथेरानमध्ये पर्यावरणपूरक रस्त्यांच्या कामासाठी ‘क्ले पेव्हर ब्लॉक’चा वापर योग्य असल्याचा अहवाल राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (NEERI) ने सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. वीरमाता जिजाबाई तांत्रिक संस्थेच्या अभ्यासासही नीरीने मान्यता दिली आहे. या अहवालामुळे सध्या अर्धवट राहिलेले अंतर्गत रस्त्यांचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी माथेरानमध्ये क्ले पेव्हर ब्लॉक्स वापरण्याच्या कामावर स्थानिक घोडेवाले संघटनांनी आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, हे रस्ते घोड्यांच्या चालण्यास अपायकारक आहेत व पर्यावरणालाही धोका निर्माण करतात. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने नीरीकडून तांत्रिक अहवाल मागवला होता. त्यानुसार, क्ले पेव्हर ब्लॉक्स मातीची धूप रोखतात, पावसाचे पाणी जमिनीत मुरू देतात आणि रस्ते नैसर्गिक वातावरणाशी सुसंगत राहतात, असे नमूद करण्यात आले आहे. सध्या माथेरानमध्ये अनेक रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. पावसाळ्यात हे रस्ते चिखलमय व घसरडे होतात, त्यामुळे नागरिकांना व पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. क्ले पेव्हरला मंजुरी मिळाल्यास हे काम पुन्हा सुरू होऊ शकते. सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित असून, तो माथेरानच्या विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी निर्णायक ठरणार आहे.

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

दारूच्या वादातून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; म्हणाला "चुकून झालं", मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून बाहेर जाऊन खाल्ली बिर्याणी