महाराष्ट्र

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढल्या; २४५ नवीन जागा : महाराष्ट्रात सर्वाधिक वाढ

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) अतिरिक्त १७१ पदव्युत्तर वैद्यकीय जागांना मंजुरी दिल्यानंतर आता पुन्हा आयोगाने २४५ जागांना मान्यता देण्यात आली आहे. एनएमसीच्या प्रथम अपील समितीच्या मंजुरीमुळे अनेक राज्यांमध्ये तसेच प्रमुख अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) अतिरिक्त १७१ पदव्युत्तर वैद्यकीय जागांना मंजुरी दिल्यानंतर आता पुन्हा आयोगाने २४५ जागांना मान्यता देण्यात आली आहे. एनएमसीच्या प्रथम अपील समितीच्या मंजुरीमुळे अनेक राज्यांमध्ये तसेच प्रमुख अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या जागांचा समावेश तिसऱ्या फेरीमध्ये करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एमएआरबीने मंजूर केलेल्या जागांच्या निर्णयाविरोधात काही वैद्यकीय महाविद्यालयांनी अपील केले होते. या अपीलाबाबत प्रथम अपील समितीने विचारविमर्श करून २४५ जागांना मंजुरी दिली. या मंजूर पदव्युत्तर जागांसाठी लवकरच परवानगी जारी करण्यात येणार आहे. समुपदेशन प्रक्रियेत या जागांचा समावेश करण्यासाठी समुपदेशन प्राधिकरणांनी संस्थांकडून एलओपीची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.

महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना सर्वाधिक जागावाढ मिळाल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ५३, तेलंगणा ४१, राजस्थानमध्ये २६, बिहारमध्ये २१ उत्तर प्रदेशमध्ये १६, दिल्लीला १४ जागा मंजूर झाल्या आहेत. महाराष्ट्रात सोलापूर, नागपूर, सांगली, अमरावती, नवी मुंबई आणि जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयांना विविध अभ्यासक्रमांत अतिरिक्त जागांना मंजुरी देण्यात आली आहे. विशेषतः जनरल मेडिसिन, रेडिओ डायग्नोसिस, जनरल सर्जरी, डर्मेटोलॉजी आणि पेडियाट्रिक्स या अभ्यासक्रमांमध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे. एनएमसीच्या या निर्णयामुळे देशातील तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यास मदत होणार आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार आहे.

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

Mumbai Property Tax : मालमत्ता कराचे बिल आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर; BMC ची नवी डिजिटल सेवा लवकरच सुरू

वाशिममध्ये मध्यरात्री भीषण आग! काही मिनिटांत चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, VIDEO

Mumbai : सभागृहातील आसन व्यवस्था उत्कृष्ट; तीन वर्षांत एकही तक्रार नाही

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा; सावंतवाडी रोड स्थानकावर तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा