MIDC कर्ज उभारणी अधिकारात वाढ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

MIDC कर्ज उभारणी अधिकारात वाढ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कर्ज उभारणीच्या अधिकारात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणा करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कर्ज उभारणीच्या अधिकारात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणा करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

भूसंपादनात शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्यासाठी तसेच नवीन औद्योगिक प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अतिरिक्त आर्थिक संसाधनांचीआवश्यकता राहणार एमआयडीसीसाठी हा निर्णय घेण्यात आला.

एमआयडीसीला पुरंदर विमानतळ जमीन संपादनासाठी हुडकोकडून ६ हजार कोटींचे कर्ज घेण्यास राज्य सरकारने मान्यता आणि शासन हमी दिली आहे.

सध्या पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. तसेच राज्यात विविध औद्योगिक क्षेत्रे, विशेष आर्थिक क्षेत्रे आणि आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन सुरू आहे. त्यादृष्टीने महामंडळाच्या कर्ज उभारणीच्या सध्याच्या मर्यादेत वाढ करण्यासाठी या अधिनियमातील तरतुदीमध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.

सक्तीची सेवानिवृत्ती शिक्षा नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

राष्ट्रवादीमध्ये राजकीय हालचालींना वेग; पार्थ यांनी घेतली शरद पवारांची भेट; शशिकांत शिंदे, आव्हाड यांच्या उपस्थितीत चर्चा

पर्यावरण मंत्र्यांचे पर्यावरणाचे ज्ञान शून्य; कर्जतमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांचे टीकास्त्र

आणीबाणी ही चूक; सोनिया गांधी यांचे विधान, इंदिराजींनाही खंत वाटल्याचा मुलाखतीत दावा

गोकुळमध्ये रस नाही; सरकारी संचालक नेमण्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा