(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

मला अटक झाल्यास लाखो मराठा उपोषणाला बसतील -जरांगे

जर आपल्याला अटक करण्यात आली तर कोट्यवधी मराठा उपोषणाला बसतील असा दावा मराठा आंदोलन कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी गुरुवारी केला

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : जर आपल्याला अटक करण्यात आली तर कोट्यवधी मराठा उपोषणाला बसतील असा दावा मराठा आंदोलन कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी गुरुवारी येथे केला. विशेष वर्गवारीनुसार मराठ्यांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य विधीमंडळात घेण्यात आला, त्याला आपला विरोध असल्याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.

मराठा समाजाला जे १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे, त्यामध्ये सामाजिक आर्थिक मागासवर्गाला ज्या सवलती देण्यात आल्या आहेत. त्याचा अंतर्भाव केल्यास हे १० टक्के आरक्षण आम्हाला स्वीकारार्ह असेल, असेही जरांगे म्हणाले.

मराठा समाज आपल्या हक्कांसाठी लढा देत असल्याचेही जरांगे यांनी येथील एका खासगी रुग्णालयात वार्ताहरांना सांगितले. सगेसोयरे मसुदा अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची सरकारकडे अद्यापही संधी आहे, समाज त्याचे स्वागतच करेल, असेही जरांगे म्हणाले.

पात्र कुणबी (इतर मागासवर्ग) मराठ्यांना प्रमाणपत्रे देण्याबाबतची अधिसूचना जानेवारी महिन्यातच जारी करण्यात आली.

आपल्याला कारागृहात डांबण्यात आले तरीही मराठा समाज आणि आपण स्वत: ज्यां मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत त्यांच्या नातेवाईकांनाही आरक्षण देण्याची मागणी सोडणार नाही. आपल्याला एक रुपयाचाही लोभ नाही, त्यांनी मला खुशाल अटक करावी, ते ज्या मार्गावरून आपल्याला कारागृहाकडे नेतील त्या मार्गावर मराठा समाजातील कोट्यवधी लोक रस्त्यावर उपोषणाला बसलेले दिसतील, असेही जरांगे म्हणाले.

महावितरण कंपनीच्या विभाजनावर शिक्कामोर्तब; शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी महावितरणचा IPO येणार

आता राज्यभरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास चार वर्षांचा होणार; विद्यापीठांमध्ये २०२६-२७ पासून 'ऑनर्स' आणि 'संशोधन' पदवीचे नवे पर्याय उपलब्ध

Mumbai : बेस्टला आर्थिक बळाची गरज; महाव्यवस्थापकांचे पालिका आयुक्तांना निवेदन; एकरकमी ४ हजार कोटी देण्याची मागणी

उरण : आदिवासी वाड्यांची पाण्यासाठी वणवण; रानसई-पुनाडे धरणात अवघा ४७% साठा

आंतरजातीय विवाहामुळे जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार