संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

खातेवाटपाचा फॉर्म्युला; भाजपला २२, शिवसेनेला १२, राष्ट्रवादीला ११ मंत्रिपदे?

महायुतीचा शपथविधी सोहळा गुरुवारी रंगणार असून मुख्यमंत्र्यांबाबत कोणताही निर्णय झाला नसला तरी खातेवाटपाचा फॉर्म्युला मात्र ठरल्याचे समजते. भाजपकडे महत्त्वाच्या खात्यांसह २१ ते २२ खाती असण्याची शक्यता असून शिवसेना शिंदेंच्या वाट्याला १२, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ११ खाती मिळण्याची शक्यता आहे.

Swapnil S

महायुतीचा शपथविधी सोहळा गुरुवारी रंगणार असून मुख्यमंत्र्यांबाबत कोणताही निर्णय झाला नसला तरी खातेवाटपाचा फॉर्म्युला मात्र ठरल्याचे समजते. भाजपकडे महत्त्वाच्या खात्यांसह २१ ते २२ खाती असण्याची शक्यता असून शिवसेना शिंदेंच्या वाट्याला १२, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ११ खाती मिळण्याची शक्यता आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासाठी ठाम असल्यामुळे महायुतीच्या सरकार स्थापनेला विलंब होत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठींकडून अजूनही मुख्यमंत्र्यांच्या नावाला हिरवा कंदील मिळालेला नाही.

भाजपकडे गृह आणि महसूलसारखे खाते कायम राहू शकते. याशिवाय त्यांना सभापती आणि विधान परिषदेचे अध्यक्षपदही मिळू शकते. भाजपकडून पंकजा मुंडे, अतुल सावे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, आशीष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, चंद्रशेखर बावनकुळे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, गणेश नाईक, माधुरी मिसाळ, जयकुमार रावल हेसुद्धा मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपचे एकूण १६ मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने १६ मंत्रिपदाची मागणी केली असली तरी त्यांना ११ ते १२ खाती मिळून शकतात. यामध्ये एकनाथ शिंदे, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, संजय राठोड आणि उदय सामंत यांची कॅबिनेटपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ११ खाती मिळणार असून अर्थ खाते हे राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, अदिती तटकरे, दत्तात्रेय भरणे, अनिल पाटील, सुनील शेळके, हसन मुश्रीफ यांची कॅबिनेटपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

स्ट्राईक रेटनुसार मंत्रिपदे द्या - भुजबळ

"स्ट्राईक रेटनुसार आम्ही दोन नंबरवर आहोत. त्यामुळे आम्हालाही शिंदेंच्या बरोबरीने मंत्रि‍पदे द्या, एवढीच आमची मागणी आहे. सध्या जी नावे समोर येताहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. ज्या दिवशी शपथविधी असतो, त्याच्या एक दिवसआधी पक्षाकडून मंत्र्यांची नावे ठरवली जातात किंवा मंत्रिमंडळाची जी यादी राज्यपालांकडे जाते, तीच खरी असते. मात्र, तोपर्यंत हे सर्व अंदाज असतात," असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितले.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास