महाराष्ट्र

आमदार सुर्वे यांचा पुत्र फरार, अन्य साथीदारांना विमानतळावरून अटक

म्युझिक कंपनीचे सीईओ राजकुमार सिंग यांचे बंदुकीच्या धाकावर सुपारी घेऊन अपहरण करणारे...

नवशक्ती Web Desk

म्युझिक कंपनीचे सीईओ राजकुमार सिंग यांचे बंदुकीच्या धाकावर सुपारी घेऊन अपहरण करणारे मागाठाणे येथील शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या तीन साथीदारांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राज मात्र अद्याप फरार असून त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. वनराई पोलिसांनी राजचे तीन साथीदार मनोज मिश्रा, पुनित सिंग आणि चंदन सिंग यांना गुरुवारी अटक केली. या तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून त्यात राज आणि त्याचे 10 ते 15 साथीदार दिसत आहेत. सिंग यांच्या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. विमानतळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तिघांना अटक केली. वनराई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामपियारे राजभर यांनी सांगितले की, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत.

सिंग यांची गोरेगावमध्ये 'ग्लोबल म्युझिक जंक्शन' नावाची कंपनी आहे. याद्वारे ते कर्ज देण्याचे काम करतात. कंपनीने 2021 मध्ये मिश्रा यांच्या संगीत कंपनी 'आदिशक्ती'ला 8 कोटी रुपयांचे कर्ज दिले आणि 5 वर्षांचा करार आणि 3 वर्षांचा लॉकिंग कालावधी ठेवला. करारानुसार सिंग यांना 5 वर्षात 11 कोटी मिळणार होते. मात्र, मिश्रा यांनी ते पैसे चॅनलसाठी कंटेंट बनवण्यासाठी वापरण्याऐवजी वळवले आणि कंपनीचा नफा कमी झाला आणि त्यांनी करार रद्द करण्यासाठी दबावही आणला. मिश्रा यांनी आणखी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली आणि 9 ऑगस्ट रोजी सिंग यांना प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देण्यात आली होती.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?