MPSC चे हरपाळकर यांची उचलबांगडी; सामान्य प्रशासन विभागाचा आदेश जारी 
महाराष्ट्र

MPSC चे हरपाळकर यांची उचलबांगडी; सामान्य प्रशासन विभागाचा आदेश जारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची शुक्रवारी अखेर उचलबांगडी करण्यात आली. हरपाळकर यांची आयोगावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची शुक्रवारी अखेर उचलबांगडी करण्यात आली. हरपाळकर यांची आयोगावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी फडणवीस यांनी लोकसेवा आयोगाचे सचिव हरपाळकर यांची तत्काळ बदली करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणणारा निर्णय जारी केला.

विद्यार्थी आंदोलनानंतर निर्णय

सहसचिव संवर्गातील अधिकारी असलेले महेंद्र हरपाळकर यांची २२ डिसेंबर २०२५ च्या आदेशाने दोन वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर सचिव म्हणून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आयोगाच्या औषध निरीक्षक पदाची प्रश्नपत्रिका फुटल्याने विद्यार्थ्यांनी आयोगाच्या विरोधात आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हरपाळकर यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'ज्ञानेश कुमार मस्ट गो'चा नारा! शिवाजी पार्कवर अवतरली तरुणाई; राजीनामा न दिल्यास 'पुन्हा जंतरमंतर'चा अभिजीत दीपकेंचा इशारा

शिक्षणाचे खासगीकरण कंपनीकरणाच्या दिशेने

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ३ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

रोजच्या आहारात मोड आलेले कडधान्य खाता? वेट लॉस आणि प्रोटीनसाठी कोणते निवडाल, जाणून घ्या