MPSC भरतीप्रकरणी काँग्रेस आक्रमक; राज्यपालांची भेट घेऊन दिले निवेदन  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

MPSC भरतीप्रकरणी काँग्रेस आक्रमक; राज्यपालांची भेट घेऊन दिले निवेदन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे पदाधिकारी, एनएसयूआयचे पदाधिकारी, विद्यार्थी व परीक्षार्थींच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची भेट घेऊन एमपीएससी व शासकीय भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत निवेदन दिले.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे पदाधिकारी, एनएसयूआयचे पदाधिकारी, विद्यार्थी व परीक्षार्थींच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची भेट घेऊन एमपीएससी व शासकीय भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत निवेदन दिले.

पेपरफुटी, सीबीटी आणि नॉर्मलायझेशन, परीक्षा पुढे ढकलल्याने निर्माण झालेली वयोमर्यादेची अडचण, प्रलंबित भरती आणि राज्यातील सुमारे २.५ लाख रिक्त पदांचा प्रश्न यावेळी मांडण्यात आला. शिष्टमंडळात रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी, राज्य संयोजक कॅप्टन अमोल महाडिक, इर्विन डी’मेलो, गिरीश उगले पाटील, राजेंद्र पालांडे, मयूर पाटेकर, मयूर गुंजाळ, एनएसयूआयचे राज्य सरचिटणीस मंगेश दुतोंडे, सौरभ शिंदे व प्रांकेश के. यांच्यासह विविध विभागांतील विद्यार्थी व परीक्षार्थींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान, राज्यपालांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली असून आवश्यक कार्यवाहीसाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. धनंजय शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांना आता पारदर्शक परीक्षा, वेळेत भरती आणि न्याय हवा आहे. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मंडपांना थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; प्रति खड्डा दोन हजार दंड वसुली, BMC चा इशारा

नोकरी गेल्यास अमेरिकेतून बाहेर; ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी रद्द करण्याची तयारी, ट्रम्प प्रशासनाचा H-1B व्हिसाबाबत कठोर पवित्रा

NSS विद्यार्थ्यांची 'निर्माल्य मुक्ती' मोहीम; प्लास्टिक-थर्माकोल वेगळे करून खताची निर्मिती

पुण्यातील १० दिवसांची दारूबंदी रद्द; उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर निर्णय मागे, गणेशोत्सवात केवळ दोनच दिवस निर्बंध

‘सर्वच न्यायालये बहुसंख्याकवादाकडे’; SC चे निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी व्यक्त केली चिंता