महाराष्ट्र

MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; नवा अभ्यासक्रम २०२५पासून लागू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम हा २०२५पासून लागू होणार असल्याचे जाहीर

प्रतिनिधी

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम हा २०२५पासून लागू होणार असल्याचे जाहीर रण्यात आले आहे. यासंदर्भात ट्विट करून माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे." त्यामुळे आता एमपीएससी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस