पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धग कायम 
महाराष्ट्र

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धग कायम

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धग पाचव्या दिवशीही कायम राहिली. शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असून, या आंदोलनांना विविध राजकीय नेत्यांनी भेटी दिल्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Swapnil S

पुणे : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धग पाचव्या दिवशीही कायम राहिली. शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असून, या आंदोलनांना विविध राजकीय नेत्यांनी भेटी दिल्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. परीक्षा पद्धतीमधील बदल आणि एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा मागण्यांसाठी पाचव्या दिवशीही पुण्यात तीन ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.

एस. एम. जोशी पूल येथे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या सत्याग्रह आंदोलनात एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी आहे. याशिवाय ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तर लाल बहादूर शास्त्री रस्ता येथे दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांची मुख्य मागणी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घ्यावी हीच आहे. तसेच, अलका टॉकीज चौक येथे तिसऱ्या गटाचे आंदोलन वेगळ्या भूमिकेत असून, त्यांची मागणी परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने घ्यावी अशी आहे.

आंदोलनाच्या राजकीय नेत्यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला. एस. एम. जोशी पुलाजवळील आंदोलनाला खासदार संजय राऊत आणि सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील आंदोलनाला मंत्री नीतेश राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि समर्थन जाहीर केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तांदूळ, ज्वारी, तूर, हरभरा कडाडला; दिवाळीच्या तोंडावर किराणा बजेट कोलमडणार

कायदा, पोलिसांची भीती गरजेची : सर्वोच्च न्यायालय

फॉर्म ६ फेरफारांची चौकशी; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, निवडणूक आयोगाला नोटीस; एकमताने किंवा बहुमताने न घेतलेले निर्णय रद्द करणार

Mumbai : ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे तरुणाचा मृत्यू; चार मित्रांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

राज्यावर पाणीसंकट! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा विभागाचा निर्णय