एसटीच्या तिकीट महसुलात सरासरी दैनंदिन तूट; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी 
महाराष्ट्र

एसटीच्या तिकीट महसुलात सरासरी दैनंदिन तूट; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

राज्य परिवहन महामंडळाच्या दैनंदिन वाहतूक अहवालानुसार सवलत मूल्य रकमेसह प्रवासी तिकिटांमधून मिळणारी सहा कोटी रुपयांची दैनंदिन तूट नोंदवली गेली आहे. ऑक्टोबर महिन्यातच १८० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दैनंदिन वाहतूक अहवालानुसार सवलत मूल्य रकमेसह प्रवासी तिकिटांमधून मिळणारी सहा कोटी रुपयांची दैनंदिन तूट नोंदवली गेली आहे. ऑक्टोबर महिन्यातच १८० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

याप्रकरणी उत्पन्न घटण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालविली जाते. पण प्रत्यक्षात ती सतत तोट्यातच आहे. या आर्थिक चणचणीमुळे महामंडळाला दर महिन्याला सरकारकडे मदतीची याचना करावी लागते, असे ते म्हणाले.

श्रीरंग बरगे म्हणाले की, या वर्षी झालेल्या १४.९५ टक्के भाडेवाढीचा विचार करता प्रतिदिन सरासरी ३३ कोटींचे उत्पन्न मिळायला हवे होते. परंतु ऑक्टोबरमध्ये हे उत्पन्न केवळ २६.५५ कोटी इतकेच राहिले. म्हणजे उद्दिष्टाच्या तुलनेत मोठी तूट निर्माण झाली असून, हा आकडा १,००० कोटींपेक्षा जास्त अपेक्षेवर १८० कोटींनी कमी असल्याचे निरीक्षण बरगे यांनी नोंदवले आहे.

११ हजार कोटींच्या संचित तोट्याच्या गर्तेत अडकलेली एसटी आणखी खोलवर अडकण्याच्या स्थितीत आहे. तिकीट विक्रीतील घट का होते आहे, याचा अभ्यास करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांचा स्वतंत्र गट तातडीने नेमला पाहिजे.
श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

वर्षानुवर्षे एकच खुर्ची पकडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नाहीत, तर एसटीला उभारी देणे कठीण होईल. आवश्यकता भासल्यास त्यांच्या विरोधात गंभीर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणीही महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

BMC त सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक; पूर्णकालिक तत्त्वावरील पदासाठी १२ अर्ज दाखल; १० व १२ नोव्हेंबर रोजी होणार मुलाखत

१ ते १९ डिसेंबर या संसदेचे कालावधीत हिवाळी अधिवेशन

बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला; २७ वर्षांपासून फरार असल्याने विशेष न्यायालयाने दिला झटका

एअर इंडिया विमान अपघात, तुमच्या मुलाचा दोष नाही; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

माजी उपमुख्यमंत्र्यांची पत्नी असल्याचा बनाव; पेन्शन लाटणाऱ्या आरोपी महिलेचा सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर