एसटीमध्ये NCMC कार्ड अनिवार्य; १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट कार्डद्वारेच मिळणार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

एसटीमध्ये NCMC कार्ड अनिवार्य; १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट कार्डद्वारेच मिळणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभघेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. सवलतीचे तिकीट देताना एनसीएमसी कार्डचा वापर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभघेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. सवलतीचे तिकीट देताना एनसीएमसी कार्डचा वापर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया आगार आणि स्थानकांवर सुरू करण्यात आली आहे.

एसटीकडून विविध सामाजिक घटकांना शासन निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. त्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतीचा समावेश आहे. याचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.

... तरच लाभ मिळणार

१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट एनसीएमसी कार्डमधूनच वितरित केले जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांनी त्यापूर्वी एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे कार्यरत एनसीएमसी कार्ड आहे किंवा कार्ड नोंदणी केल्याची क्यूआर कोड असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ मिळणार आहे.

नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य

नोंदणी केल्यानंतर मिळालेली क्यूआर कोडयुक्त पावती वाहकाच्या मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. ही पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार असून या कालावधीत कार्ड अॅक्टिव्ह करून त्यामध्ये टॉप अप करणे आवश्यक आहे.

ओटीपीआधारे कार्ड नोंदणी

आधारकार्डवरील बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओटीपीआधारे कार्ड नोंदणी करण्याची कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरचे काम मार्च २०२७ पासून सुरू; MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाडांची ग्वाही

Mumbai : केबल्स चोरीमुळे कोस्टलवरील तिसरा डोळा बंद; ६० ते ६५ CCTV कॅमेरे निकामी, संबंधित पोलीस ठाण्यात २५ FIR दाखल

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन; काँग्रेस, ठाकरे बंधूंचे स्वतंत्र मोर्चे

मराठा आरक्षणाचे आंदोलनस्थळ ११२३ दिवसांनंतर अखेर रिकामे; मंडप, व्यासपीठ हटवले

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज; भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष