मुंबई : कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने मुंबई-मडगावदरम्यान २ विशेष रेल्वे सेवा चालवणार आहे. ०१५०१ विशेष गाडी सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता एलटीटी मुंबईहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री १२.४० वाजता मडगावला पोहोचेल.
०१५०२ विशेष गाडी रविवार १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता मडगावहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.०० वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल.
ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी येथे थांबे असतील.
एक एसी-२ टियर, तीन एसी-३ टियर, दोन एसी-३ टियर इकॉनॉमी, ८ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास, १ जनरेटर कार आणि १ सेकंड सीटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन. अशी रचना असेल.
विशेष ट्रेन क्रमांक ०१५०१ साठी बुकिंग १३ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर आरक्षण सुरू होईल. या गाड्यांचा फायदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.