महाराष्ट्र

विवाहितेला पळवून नेणाऱ्या युवकाच्या वडिलांचा केला खून; आई व भावावरही सपासप वार

कराडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सैदापूर ता. कराड येथील अंबक वस्ती येथे विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या रागातून युवकाच्या वडिलांचा चाकूने भोकसून खून करण्यात आला तर त्याची आई व भावावरही सपासप वार...

Swapnil S

कराड : कराडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सैदापूर ता. कराड येथील अंबक वस्ती येथे विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या रागातून युवकाच्या वडिलांचा चाकूने भोकसून खून करण्यात आला तर त्याची आई व भावावरही सपासप वार करण्यात येऊन त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी एकाला अटक केले आहे.

यामध्ये बाबा आळवंत मदने (५०) असे खून झालेल्याचे नाव आहे तर याप्रकरणी विजय धर्मा जाधव (५५) याच्यावर गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तडवळे येथील बाबा मदने, त्यांची पत्नी इंदू, धाकटा मुलगा अजित हे सैदापुरातील अंबक वस्तीत संतोष देसाई यांच्या गुऱ्हाळगृहावर ऊसतोडीचे काम करतात तर त्यांचा मोठा मुलगा अक्षय हाही गावातील सुरेश साळुंखे यांच्या गुऱ्हाळगृहावर ट्रॅक्टरचालक म्हणून काम करतो. त्याच गुऱ्हाळवर विजय जाधव हा कुटुंबासह मजुरी करतो. गत आठवड्यात अक्षयने विजय जाधव याच्या नात्यातील एका विवाहितेला पळवून नेले. त्याबाबतचा राग त्याच्या मनात होता. त्याच कारणावरून तो मदने कुटुंबियांना वारंवार शिवीगाळ, दमदाटी करीत होता.

बुधवारी रात्रीच्या सुमारास विजय जाधव दुचाकीवरून मदने यांच्या झोपडीजवळ आला. त्याने चिडून जावून इंदू यांच्यावर चाकूने सपासप वार केले. बाबा मदने यांच्या छातीत चाकू भोकसला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अजितवरही त्याने चाकूने वार केले. जखमींना तातडीने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी 'डेडलाईन', आयोगालाही फटकारले

खाडाखोड असेल तर मराठ्यांना प्रमाणपत्र देऊ नये; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र कॅबिनेट बैठकीत ८ मोठे निर्णय; ॲनिमेशन-गेमिंग धोरणासह विद्यार्थ्यांना दिलासा

महाराष्ट्र सदन घोटाळा : बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त; मंत्री छगन भुजबळ यांना दिलासा

Mumbai : इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा आजपासून सुरू; एक किमीला १५ रुपये भाडे; राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी